Surprise Me!

सोनं चांदीच्या दरात तीन दिवसांत झाली मोठी घसरण पाहा हा वीडियो | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे.त्यामुळे तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या साठी एक आनंदाची बातमी आहे.सोन्याच्या दरात जागतिक स्तरावर मागणी कमी झाल्याने दरात घट झाली आहे.सोन्याच्या दरात 2009o रुपयांनी घट झाल्याने सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 29,750 रुपयांवर पोहोचला आहे. तर, त्या सोबतच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. चांदीच्या दरात 425 रुपयांनी घट झाल्याने 37,700 रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचली आहे.<br />सोन्याच्या दरात झालेली घट ही या आठवड्यात 2.5 टक्क्यांनी कमी झाली आहे. ही घटीने 5 मे पासूनचा निच्चांक गाठला असल्याचं म्हटलं जात आहे. आंतर राष्ट्रीय बाजारामध्ये सोनं 1.27 टक्क्यांनी घट झाल्याने तो 1247.80 डॉलर प्रति औन्स झाला आहे. तर, चांदीमध्येही 1.41 टक्क्यांनी घट झाल्याने 15.70 डॉलर प्रति औन्स झाला आहे. यासोबतच स्थानिक बाजार आणि ज्वेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट झाल्याचं दिसत आहे. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon